धर्मा प्रॉडक्शनचा माजी निर्माता क्षितिज प्रसाद एनसीबीच्या अटकेत

On: September 26, 2020 8:17 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी चौकशी आणि अटकेच्या कारवाया सुरुच आहेत. आज शनिवारी मुंबईच्या एनसीबी टीमने बॉलिवूडशी संबंधित क्षितीज प्रसाद यास अटक केली. क्षितिज हा धर्मा प्रॉडक्शनमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून तो एनसीबीच्या रडारवर होता. आज क्षितिजला अटक करण्यात आली आहे. क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार काही छायाचित्रे उघडकीस आली असून त्यात धर्मा प्रॉडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद एका ड्रग पेडलरसोबत उभे असल्याचे दिसत आहे. ड्रग्ज संबंधात हे छायाचित्र क्षितीज प्रसादविरुद्ध सर्वात मोठा पुरावा समजला जात आहे.

अंकुश अरेना असे छायाचित्रातील ड्रग पेडलरचे नाव आहे. एनसीबीने चौकशी व पुरावे मिळाल्यानंतरच क्षितीजला अटक केली आहे. क्षितिजच्या घरी प्रत्येक पार्टीच्या वेळी अंकुश सामील होत असे.क्षितीज प्रसाद हा करण जोहरच्या अगदी जवळचा मानला जात असला तरी करण जोहर याने त्याच्याबद्दल माहिती देण्यास नकार दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment