म.रा.मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे

On: September 27, 2020 8:20 PM

जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी जळगाव येथील पत्रकार प्रविण सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी त्यांना नुकतेच दिले आहे. पत्रकार प्रविण सपकाळे यांनी गेल्या चार वर्षांपासून जळगाव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, इम्रान शेख, सुनील भोळे, संतोष ढिवरे,भरत काळे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे, अभिजित पाटील, नाजनीन शेख, चेतन निंंबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment