पत्रकार शरद बन्सी यांच्या परिवाराला शासनाने मदत करावी

sharad bansi

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील दै.लोकमतचे पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना योद्धा असलेल्या पत्रकार शरदकुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयांंची मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज इमेल च्या माध्यमातून निवेदन देत केली आहे.

दै.लोकमतचे पत्रकार शरद बन्सी यांनी कोरोना काळात देखील जीवाची पर्वा न करता वृत्तांकन केले. कोरोना काळातील त्यांची सेवा लक्षात घेता धरणगाव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित देखील करण्यात आले होते. अशा कोरोना योध्याच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे आदी पाठपुरावा करणार असल्याचे प्रविण सपकाळे यांनी कळवले आहे.

निवेदनकर्ते म्हणून खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, नरेश बागडे, दिपक सपकाळे, प्रमोद सोनवणे,भूषण महाजन, मुकेश जोशी, रितेश माळी, संजय तांबे, सुनील भोळे,बाळू वाघ व जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here