शिवसेना माजी शाखा प्रमुखाची हत्या

On: September 27, 2020 10:29 PM

भिवंडी : भिवंडी येथील कामतघर शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (68) यांची निर्घृण हत्या झाली आहे. गुरुनाथ पाटील यांनी हत्या त्यांच्याच मुलाने केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. ब्रिजेश पाटील असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून तो नारपोली पोलिसांच्या अटकेत आहे.

गुरुनाथ पाटील आपल्या घरात झोपले असताना ब्रिजेश याने धारदार सु-याने त्याचे वडील गुरुनाथ यांच्या मानेसह तोंडावर सपासप वार केले. यात गुरुनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुनाथ पाटील यांचे त्यांच्या मुलांसोबत गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वाद सुरु होते.

गुरुनाथ पाटील यांनी वेळोवेळी नारपोली पोलिसांकडे त्यांचा मुलगा ब्रिजेश विरुद्ध तक्रार देखील केली होती. त्याच्या विरुद्ध नारपोली पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment