पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांची भुसावळला भेट

On: September 28, 2020 2:40 PM

जळगाव : डॉ. प्रविण मुंडे यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर आज प्रथमच भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस स्टेशनला भेट दिली. या भेटीत त्यांनी भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पो.नि.बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांच्याकडून आपाआपल्या हद्दीतील गुन्हेगारीचा आढावा घेतला.

भुसावळ शहर व परिसरात गुन्हेगारांकडून वारंवार आढळून येणारे गावठी कट्टे व गुन्हेगारी कारवाया या विषयावर यावेळी त्यांनी दोघा अधिका-यांशी चर्चा केली. दाखल गुन्हे, प्रलंबीत गुन्हे, तडीपार गुंडावरील कारवाया आदी विषयासह तपासाची दिशा याबाबत त्यांनी अधिकारी वर्गाला योग्य ते मार्गदर्शन केले. शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रभावशाली पावले उचलण्यासाठी त्यांनी दिशानिर्देश दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment