आम्ही सिगारेटला “माल” म्हणतो, मालाचा अर्थ “तो” नाही – दिपीका पदुकोन

मुंबई : आम्ही सिगारेट ओढतो मात्र अमली पदार्थ घेत नाही असा दावा दिपीका पदुकोन हिने एनसीबीच्या चौकशीत कबुल केले आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार एकमेकांशी संवाद साधतांना बऱ्याच कोडवर्ड्सचा वापर करत असल्याचे तिने सांगितले आहे.

दीपिकाने तिच्या एका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये “माल” या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला २०१७ च्या चॅटमधील “माल आहे का” या प्रश्नातील “माल” या शब्दाचा अर्थ विचारला. त्यावर हो, मी तो प्रश्न विचारला होता असे दिपीकाने उत्तर देतांना सांगितले. मात्र “माल” या शब्दाचा जो अर्थ तुम्ही काढलाय, त्या अर्थानं मी तो प्रश्न विचारला नव्हता अशी पुष्टी दिपीकाने उत्तरात जोडली. आम्ही सिगारेटला “माल” म्हणतो. सिगारेटसाठी तो आमचा कोड वर्ड आहे, असं ती पुढे म्हणाली.

दिपीकाने तिच्या चॅट दरम्यान वापरलेल्या “हॅश” या शब्दाचा अर्थ एनसीबीने विचारला. त्यावर तिने म्हटले की ‘माल आम्ही सिगारेटला म्हणतो. हॅश आणि वीड या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेट आहेत अर्थात विविध ब्रँडच्या सिगारेट्स असल्याचे तिने स्पष्टीकरण अधिका-यांना दिले.

हॅश आणि वीड वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेट कशा असू शकतात या प्रश्नाचे उत्तर देतांना तिने म्हटले की पातळ सिगारेटला “हॅश” तर जाड सिगारेटला वीड म्हटले जाते.
एनसीबी कडून अनेक बड्या कलाकारांची चौकशी सुरु झाली असून त्यात सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव आघाडीवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here