लखनौ : बाबरी मशीद पतन प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नसल्याचे निरिक्षण न्यायालाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले. या निकालपत्रात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
बाबरी विध्वंस प्रकरणी एकूण 49 आरोपी होते. यातील 17 जणांचे सुनावणीच्या कालावधीत मृत्यू झाले आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर फैजाबादमध्ये दोन खबरी दाखल करण्यात आल्या. यातील एक खबर लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपा नेत्या उमा भारती यांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती.