पिंपरी : “एस्कॉर्ट सर्व्हिसेस”च्या नावाखाली सोशल मिडीयाच्या माध्यमातून हिंजवडी येथे हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु होता. सुरु असलेला हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा व्यवसाय पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने उघडकीस आणला. या प्रकरणी चौघा तरुणींची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे.
गणेश कैलास पवार (२०), रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख तसचे हिरा (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडी फेज एक मधील लक्ष्मी चौकालगतच्या हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे काही तरुणींकडून सक्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका डमी ग्राहकास पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. त्याठिकाणी चार तरुणींना डांबून ठेवले असल्याचे पोलिस पथकाच्या निदर्शनास आले. अटकेतील आरोपी गणेश पवार हा या हॉटेलचा मॅनेजर आहे. तो व त्याचे इतर साथीदार आरोपी गेल्या सात ते आठ दिवसांपासून या लॉजमध्ये तरुणींकडून सक्तीने देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या तरुणींची सुटका केली आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना रेस्क्यु फौंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे. युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कामगिरी पुर्ण केली.