कोल्हे नगरातील वृद्धाची आत्महत्या

On: September 30, 2020 4:38 PM

जळगाव : जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरातील जेष्ठ नागरिकाने आजाराला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली. किशोर हरी चौधरी (68) असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. ते किन्ही येथील शाळेत शिक्षक होते. गेल्या काही वर्षापासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते.

अखेर कंटाळून त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवत अनंताच्या यात्रेला निघून गेले. मंग़ळवारी मध्यरात्री घडलेला हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment