हजार रुपयांची लाच तलाठयास भोवली

On: September 30, 2020 5:10 PM

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण भागातील तलाठी सचिन एकनाथ माळी यांना आज जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून एक हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

या घटनेतील तक्रारदार हे वेंडरचा व्यवसाय करतात. त्यांच्या अशिलाचे दुकान नावावर करायचे होते. या कामाच्या मोबदल्यात लाच म्हणून आज त्यांनी पंचासमक्ष एक हजार रुपयांची लाच मागीतली स्विकारली.

या घटनेच्या वेळी जळगाव एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात तलाठी सचिन एकनाथ माळी हे अलगद सापडले. त्यांना लागलीचे ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर पुढील रितसर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली.

तलाठी काम करत असलेल्या तलाठी कार्यालयातच हा कारवाईचा प्रकार घडल्यामुळे तेथे क्षणार्धात खळबळ माजली. जळगाव एसीबीचे पोलिस उप अधिक्षक गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, सहायक फौजदार रविंद्र माळी, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, महिला पो.हे. कॉ. वंदना अंबीकार, महिला पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. सुनिल शिरसाठ, पो. ना.मनोज जोशी, पो.ना. जनार्धन चौधरी, पो.कॉ. प्रविण पाटील, पो. कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर आदीच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment