जळगाव : भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालया नजीक एका टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार खेळाच्या साहित्यासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातून जाणा-या महामार्गालगत नाहाटा महाविद्यालयानजीक असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आडोशाचा फायदा घेत नरेंद्र मोतीलाल चोरडीया (47) हा त्याच्या फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळत होता. माहिती मिळताच पो.नि. दिलीप भागवत यांनी आपल्या सहका-यांसह त्याला रंगेहाथ पकडून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 (अ) नुसार कारवाई केली. त्याच्या ताब्यातुन 2100 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रमण सुरळकर ,पो. कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करत आहेत.