हाथरस : हाथरस येथील दुर्दैवी घटनेत संशयीतांनी पिडीतेचा गळा दाबल्याने तिचे सर्वायकल स्पाईन तुटले व त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे पीएम रिपोर्टच्या माध्यमातून समोर आले आहे. सफदरजंग रुग्णालयाने पिडीतेचा मृत्यूचे हेच कारण असल्याचे नमूद केले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला असल्याच्या वृत्ताने संपुर्ण देशात संतापाची लाट उसळली. दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात पिडीतेवर वैद्यकीय उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा धक्कादायक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यात बलात्कार झाल्याचे नमुद नाही.
पीडितेचा मृत्यू हा तिच्या गळ्याचे हाड तुटल्याने झाला असून वारंवार गळा दाबल्याने तिच्या गळ्याचे हाड तुटले असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तिच्या गळ्यावर त्यासंबंधी खुणाही मिळाल्याचे नमुद करण्यात आले आहे. मृत्यूपुर्व जबाबात आपल्यावर बलात्कार झाला असल्याचे पिडीतेने म्हटले आहे. त्यानंतर ओढणीने बांधून गळा दाबण्यात आला असल्याचे म्हटले आहे.