जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर पकडून देण्याच्या संशयावरुन चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना 25 ते 30 जणांच्य टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार आज उघड झाला आहे. हातेड खुर्द व भार्डू दरम्यान असलेल्या नाल्यात हा मारहाणीचा प्रकार घडला.
मारहाण झालेले गजेंद्र सोनवणे हे चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रूक येथील रहिवासी तथा भाजपचे जि.प.सदस्य आहेत. त्यांना मारहाणीच्या वेळी लाठ्या-काठ्यांचा वापर झाला असल्याके म्हटले जात आहे. आज सकाळी झालेल्या या घटनेमुळे चोपडा तालुक्यात खळबळ माजली आहे.
जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मार बसला असून शरीरात फ्रॅक्चर असल्याचे सांगितले जात आहे. चोपडा येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. एवढी मोठी मारहाण झाल्यानंतर देखील अद्याप पोलिसात तक्रार देण्यास कुणी पुढे आले नसल्याचे देखील समजते. या घटनेतील जखमी गजेंद्र सोनवणे उपचार घेत आहेत.