जळगाव : गेल्या महिन्यात 10 सप्टेबर रोजी पाळधी ता.धरणगाव शिवारातील महामार्गालगत असलेल्या जे.के.टायर गोडाऊन मध्ये चोरट्यांनी लोखंडी खिडकी अनाधिकारे तोडून आत प्रवेश करुन 23,20,570/- रुपये किमतीचे टायर्स व रोख रक्कम चोरी केली होती. धरणगाव पोलीस स्टेशन या प्रकरणी भाग 5 गु.र.न. 178/2020 भा.द.वि. 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना खब-याकडून माहिती मिळाली की, उस्मानाबाद जिल्हयातील वासी तालुक्यातील तेरखेडा गावातील काही इसमांनी लाखो रुपये किमतीचे टायर्स व रोख रुपये घरफोडी करुन चोरुन नेले आहेत. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी उस्मनाबाद येथील पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांचेशी संपर्क साधून आरोपी पकडण्याकामी मदत मागीतली होती.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सदर आरोपीतांच्या शोधकामी सुचना व मार्गदर्शन केले होते.
पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक पो.हे.कॉ.सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील , अनिल देशमुख , अश्रफ शेख, रामकृष्ण पाटील इद्रीस पठाण यांना तेरखेडा ता.वासी, उस्मानाबाद येथे रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबद चे पोलीस निरीक्षक शेख व त्यांच्या सहका-यांच्या मदतीने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रहात असलेल्या तेरखेडा गावातील वस्तीत छापा टाकून आरोपी अनिल बिसाराम शिंदे रा.तेरखेडा, तालुका – वासी, जिल्हा उस्मानाबाद यास ताब्यात घेतले.
त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.बापू रोहोम यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ.विजय पाटील, अशोक महाजन,नारायण पाटील, पोहेकॉ.विजयसिंग पाटील,रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे, मनोज दुसाने, दिपक शिंदे ,दर्शन ढाकणे यांनी परिश्रम घेतले.
अनिल बिसाराम शिंदे यास पुढील तपासकामी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. हनुमंत गायकवाड (पाळधी दुरक्षेत्र) करत आहेत. आरोपीस 7 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.













