जळगाव : मुक्ताईनगरचे पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांच्या खुनाचा उलगडा झाला असून ग्रा.प.सदस्यांसह तिघे पोलिसांच्या अटकेत आहेत.नातेवाईकांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा दाखल झालेला गुन्हा प.स.चे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्यामुळेच झाला असल्याचा संशय असल्यामुळे सुपारी देवून हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. याप्रकरणी कु-हा काकोडा ग्रा.प.चे सदस्य तेजराव पाटील, विलास महाजन व सैय्यद शकीर सैय्यद शफी या तिघांना आज रात्री अटक करण्यात आली आहे.