उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

On: October 3, 2020 7:12 PM

जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अंतिम वर्षाच्या परिक्षा-अंतिम सत्राच्या सर्व विद्या शाखांच्या परीक्षा आता १२ ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहेत.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरु होते. त्यामुळे विद्यापिठातील कामकाज बंद झाले होते. शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या काही मागण्यांची लवकरच पुर्तता केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

आता विद्यापीठाकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार १२ ऑक्टोंबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment