अंधेरीत पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणा-या तरुणीचे प्राण

On: October 3, 2020 8:13 PM

मुंबई : जीव देण्यासाठी घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या तरुणीचा जीव मुंबई पोलिसांच्या मदतीने वाचला. अंधेरीच्या कोलडोंगरी परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

अंधेरीच्या कोलडोंगरीमध्ये राहणा-या महाविद्यालयीन तरुणीचे परिवारातील सदस्यांसोबत कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला होता. त्या वादातून रागाच्या भरात ती तरुणी सरळ गच्चीवरील पाण्याच्या टाकीवर जावून जीव देण्याच्या तयारीत होती. दरम्यान मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाली.

अंधेरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रवीण जाधव, भिंगर्दीवे, थिटे व महिला कर्मचारी सोनिया साळवी असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. प्रवीण जाधव यांनी तरुणीला बोलण्यात गुंतवून ठेवण्यात यश मिळवले. दरम्यान संधी मिळताच तिला टाकीच्या कठड्यावरुन आत खेचण्यात त्यांना यश आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment