हाथरस : पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती मुलगी आमची नसल्याचा दावा मयत पिडीत मुलीच्या परिवाराने केला आहे. या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीखाली चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कथीत सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेल्या भुमीकेबद्दल देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
गावात जाणारे व येणारे रस्ते पोलिसांनी सील केले असून नाकाबंदी केली आहे. आज शनिवारी सकाळी मीडियाला गावात जाण्याची परवानगी मिळाली. पत्रकारांनी पीडित परिवाराची वृत्तसंकलनासाठी भेट घेतली असता त्या परिवाराने खळबळजनक आरोप केला.
पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती मृत मुलगी आमची नव्हतीच असा आरोप करुन खळबळ माजवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीखाली या प्रकरणाची चौकशी होण्याची देखील मागणी त्यांनी केली.
उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असली तरी आमचा त्यावर विश्वास नसल्याचे पिडीत – मयत तरुणीच्या परिवाराने म्हटले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.