हमीद तडवी
उत्तर प्रदेशातील दलित तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करुन रावेरचे तहसिलदार व पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील दलित मुलीवर काही नराधमानी सामुहीक अत्याचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. तरीदेखील त्याठिकाणी महिला सुरक्षीत नाही. दिवसेंदिवस महिलांवर अन्याय – अत्याचाराच्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे अन्यथा मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा.
अत्याचार पिडीत तरुणीच्या परिवाराला तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी घरात डांबून ठेवण्यात आले. याचा अर्थ उत्तर प्रदेश पोलिस आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा सरकारबद्दल दलीत समाजात रोष वाढतच आहे. या घतनेची सीबीआय चौकशी होण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, कार्याध्यक्ष राजु सवर्णे, सरचिटणीस उमेश गाढे, उपाध्यक्ष संघरक्षक तायडे,पंकज वाघ, सचिव सावन मेढे, महासचिव संतोष कोसोदे, महेश तायडे, तालुका अध्यक्ष सुनिल हंसकर, सदाशीव निकम, जितेंद्र ढिवरे, जितेंद्र साबळे, आकाश शीरतुरे, सुजल छपरीबंद, प्रथम जावे, सुमित हंसकर, नरेंद्र जावे, अजय छपरीबंद, करण छपरीबंद, आदींच्या या निवेदनावर सहया आहेत.