लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील काही करोडपती पोलिस अधिकारी रडारवर आले आहेत. सुरुवातीला काही निरिक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या संपतीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत त्यांच्या पत्नीसह जवळच्या नातेवाईकांच्या नावे चार ते पाच वर्षातच पेट्रोलपंप, आलीशान बंगला व कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केली असल्याचे निष्पन्न झाले.
हस्तिनापूरचे निलंबित करण्यात आलेले पोलिस अधिकारी धर्मेंद्र सिंह यांचा शास्त्री नगर भागात फ्लॅट आणि आलिशान फार्म हाऊस असल्याची माहिती तपासात समोर आली.
हे प्रकरण समोर येताच इतर पोलिस अधिका-यांच्या संपतीची देखील पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत काही अधिका-यांची कमाई कमी व संपत्ती बेशुमार असल्याचे आढळून आले. सुरुवातीला सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या काही अधिका-यांच्या संपतीत काही वर्षातच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. या सर्व अधिकारी वर्गाच्या संपत्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.
हे देखील वाचा – कॉलेज तरुणीवर सामुहिक अत्याचार – भाजप नेत्याला अटक http://crimeduniya.com/?p=4252
एका पोलिस निरिक्षकाचे दोन पेट्रोल पंप सुरु आहेत. एका निरिक्षकाचा पॉश वसाहतीत आलीशान बंगला व कोट्यावधीचे दोन फ्लॅट असल्याचे उघड झाले. पोलिस स्टेशनचे प्रभारी पद हाती घेण्यापुर्वी दुचाकीवर येणारा हा अधिकारी काही वर्षातच अनेक लक्झरी वाहनांचा मालक झाला. याशिवाय या अधिका-याने उत्तराखंड भागात महागड्या जमीनी देखील विकत घेतल्याचे दिसून आले. या जमीनींची किंमत आगामी काळात पाच पट होण्याची दाट शक्यता लक्षात घेवूनच या जमीनी या अधिका-याने घेतल्या आहेत.
हा सर्व प्रकार लक्षात घेता उत्तर प्रदेश पोलिस खात्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यातील पुरावे शोधण्याचे कामकाज सुरु आहे. या पोलिस अधिकारी वर्गाला कुणाचे अभय आहे? असा देखील प्रश्न या निमीत्ताने निर्माण झाला आहे.