तरुण नदीत वाहून गेल्याची घटना

On: October 4, 2020 7:51 PM

जळगाव : आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रात आज दुपारच्या वेळी एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो तरुण वाहून गेल्याचे म्हटले जात आहे.

पंकज चंद्रकांत भोई असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच पो.नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे.कॉ. उमेश भांडारकर, सतिष हाळनोर, पोलिस नाईक सुशील पाटील व विजय दुसाने आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पंकज भोई याचा शोध घेतला जात आहे. मात्र अंधार झाला असल्यामुळे त्याच्या शोध कार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेची अद्याप जळगाव तालुका पोलिसात कुठलीही नोंद घेण्यात आली नव्हती. मात्र पोलिस पथक घटनासथळावर दाखल असून शोधकार्य जोमाने सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment