मुक्ताईनगरच्या महिलेची आत्महत्या

On: October 4, 2020 10:45 PM

जळगाव : मुक्ताईनगर शहराच्या तहसील रस्त्यावरील संताजी नगर येथील रहिवासी असलेल्या मीना शरद गोसावी (२२) या विवाहितेने आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पुर्णा नदीच्या खामखेडा पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.

याबाबत मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तालुक्यातील एक जण नायगाव येथे मोटरसायकलने जात असताना मिनाबाई शरद गोसावी ही विवाहिता त्यांना पूर्णा नदीच्या पुलावर उभी असलेली दिसली. त्यांनी तिच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत तिला अडवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यापुर्वीच मिनाबाई या महिलेने नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सादिक पटवे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment