तडीपार गुंडाचा पुण्यात निर्घृण खून

On: October 5, 2020 11:05 AM

पुणे : आज भल्या पहाटे खराडी येथील तडीपार गुंड शैलेश घाडगे याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. युवान आय टी पार्क नजीक नैवेद्यम हॉटेलजवळ असलेल्या मैदानात हा खूनाचा प्रकार घडला. भल्या पहाटे झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

शैलेश दत्तात्रय घाडगे (३५) असे खुन झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. घाडगे हा चंदननगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न असे विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आले होते.

घाडगे याच्यावर हल्लेखोरांनी वार करुन डोक्यात दगड घालून खून केल्याचे सकाळी फिरणा-या लोकांना दिसून आले. कुणीतरी या घटनेची माहिती नियत्रण कक्षाला दिली. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment