मुंबई : सोन्या-चांदीच्या वायदा बाजारातील किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. गेल्या 2 महिन्यात रुपयाचा भाव वधारला असून सद्यस्थितीत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत जवळपास 73 ते 74 रुपयांच्या आसपास आहे.
कोरोना संकटाच्या सुरुवातीस डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 78 रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, गेल्या महिनाभरात रुपयाचा भाव वधारला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत देखील घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी मल्टी-कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा बाजारातील दर 0.9 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे, सोन्याची किंमत 50,130 रुपये प्रतितोळा एवढी झाली आहे.
सोन्याच्या किमतीत सतत घट होत असली तरी, सोन्याची किंमत पुर्वीसारखी कमी होणार नाही. सद्यस्थितीत सोन्याचा प्रति तोळा भाव 50.000 रुपये एवढा आहे. चांदीचा दर 60 हजार रुपये प्रती किलो असा आहे. आगामी काळात देखील या भावात कमी-जास्त किंमती दिसू शकतात.
दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण किंवा वाढ बघायला मिळणार नाही असे जाणकारांचे मत आहे. दिवाळीत देखील सोन्याचा भाव 50 ते 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असू शकतो असा एक अंदाज वर्तवला जात आहे.
चांदीच्या वायदा बाजारात देखील 0.88 टक्क्यांनी घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 60,605 एवढे झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति किलोपर्यंत वधारला होता. चांदीचे भाव 80 हजार प्रति किलोपर्यंत गेले होते.
जागतिक पातळीवर सोन्याचे वायदे आणि स्पॉट अशा दोन्ही प्रकारच्या किमतीत घट झाली. ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.36 टक्क्यांनी अर्थात 6.90 डॉलरने कमी होवून 1,896.30 डॉलर प्रति औंस एवढे झाले. याशिवाय, सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 6.90 डॉलरची घट होऊन प्रति 1,896.30 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसून आला आहे.