पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ दुपारी गोळीबार

On: October 5, 2020 7:51 PM

पुणे : पुणे शहरात आज सोमवारी सकाळपासून दोन गंभीर घटना घडल्या. एका घटनेत सकाळीच तडीपार गुंडाची हत्या झाली. दुस-या घटनेत दुपारी पोलीस आयुक्तालयाच्या जवळच गोळीबाराची घटना घडली.

या घटनेत हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गंभीर अवस्थेत त्याला दवाखान्यात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिस आयुक्तालय देखील जवळच आहे. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अतिशय वर्दळीच्या जागी गोळ्या झाडून पसार झाले. शैलेश घाडगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment