जळगाव जिल्ह्यात 21 ऑक्टोबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

On: October 6, 2020 7:50 PM

जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले असून याची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच अथवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

ज्यांना लाठी अथवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग व्यक्तींना हा नियम लागू राहणार नसल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment