लखनौ : हाथरस येथील तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी देशात तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी निष्पक्ष तपास होण्यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेण्यात आली आहे.
पीडित व मयत तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणाती मुख्य आरोपी संदीप हे दोघे फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित परिवार व आरोपी दरम्यान १०४ वेळा संभाषण झाले असल्याचा दावा यु.पी. पोलिसांनी केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी व पीडित परिवाराचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यात ही माहिती पुढे आली आहे. दोन्ही परिवारात गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात फोन संपर्क आला आहे.
कॉल तपशीलानुसार ६२ कॉल पीडित परिवाराकडून तर ४२ कॉल आरोपी संदीपकडून झालेले आहेत. हे कॉल नियमीत होते. आता एसआयटी आपल्या तपासाचा अहवाल बुधवारी मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली डीआयजी चंद्रप्रकाश व एसपी पूनम या प्रकरणी तपासावर लक्ष ठेवून आहेत.