जळगाव : जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी गुड्डू उर्फ नईम भिस्ती याला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी शिताफीने अटक केली.
पोलिस निरिक्षक अरुण निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हद्दपार आरोपी गुड्डू उर्फ नईम भिस्ती हा शहरातील जुने बसस्थानक परिसरात फिरत होता. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, अक्रम शेख, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, रतन गित्ते, तेजस मराठे व योगेश इंधाटे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.