एमपीएससीची परीक्षा ढकलली पुढे

On: October 9, 2020 6:54 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियोजीत तारखेला अर्थात 11 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठकीनंतर या बाबत घोषणा केली आहे. लवकरच चर्चा करुन या परीक्षेची पुढील तारीख जाहीर केली जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे एमपीएससीची 11 ऑक्टोबर रोजी होणारी पुर्वनियोजीत परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

याविषयी आयोगाला माहिती देण्यात आली आहे. आता राज्य लोकसेवा आयोगाशी बोलून परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment