तीन कोटीं रुपयांचा हुक्का पॉर्लरसाठी वापरला जाणारा तंबाखूजन्य साठा जप्त

भिवंडी : भिवंडी पोलीस उपायुक्त परिसरात हुक्का पार्लर सुरु असल्याची ओरड असतांनाच पोलिसांनी आज तिन कोटी रुपयांचा अवैध तंबाखूनज्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. हा तंबाखूजन्य साठा हुक्का पॉर्लर मधे वापरला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हुक्का पार्लरसाठी वापरले जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची गोपनीय माहिती नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी वळ ग्रामपंचायत परिसरातील पारसनाथ गोदाम संकुलातील चार गोदामांवर छापे घातले.

व.पो.नि. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.. विजय शिरसाठ व त्यांच्या पोलीस पथकाने एकूण चार गोदामातील हुक्का पार्लरचे साहित्य व वापरात येणाऱ्या अल अकबर कंपनीच्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. हा साठा ३ कोटी ८ लाख ९६ हजार ७६० रुपयांचा आहे.

गोदाम मालक इरफान मो.अमीन सिद्दीकी (.माझगाव मुंबई) व गोदाम व्यवस्थापक फैसल रईस खान (भिवंडी) या दोघांविरुद्ध नारपोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विजय शिरसाठ करत असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here