घरात नाही कुणी – आत्महत्येचा विचार मनी

On: October 10, 2020 5:27 PM

जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील विपीन रामकृष्ण मोरे या अवघ्या सोळा वर्षाच्या बालकाने तो रहात असलेल्या घरात छताला दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने शिरसोली परिसरात शोककळा पसरली आहे.

आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विपीन मोरे या बालकाने आत्महत्या का केली? त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगडा होवू शकला नाही.

विपीन हा सकाळपासून घरी एकटाच होता. त्याचे आईवडील शेतात तर मोठा भाऊ काही कामानिमीत्त बाहेर गेला होता. त्यावेळी घरात एकटा असलेल्या विपिन याने हे कृत्य केले.

घरातील सदस्य ज्यावेळी घरात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला व एकच शोककळा परसरली. गावचे पोलिस पाटील बारी यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना हा प्रकार कळवला. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment