ठाणे : निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावरील गोळीबार प्रकरणी 11 खून व 7 खूनाच्या प्रयत्नातील फरार कुख्यात गँगस्टर सुनील विश्वनाथ गायकवाड हा ठाणे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सुनिल गायकवाड हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या शोध पथकाने त्याला मध्यरात्री अटक केली. तो नाशिक मध्यवर्ती कारागृहातुन पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो कारागृहात आलाच नव्हता. त्यामुळे त्याचा शोध सुरु होता. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्याला कळव्यातील पारसिक बोगदा परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली.
जानेवारी 2000 मध्ये अभिनेता राकेश रोशन यांच्यावर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या होत्या.