तलाठ्यास धक्काबुक्की – सागर चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल

On: October 10, 2020 10:18 PM

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याची कॉलर पकडुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज मध्यरात्री दोन वाजता घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि. 353, 323 व 332 नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुक रोखण्याकामी तहसीलदारांनी पथकांची नियुक्ती केली आहे. म्हसावद येथील तलाठी रामदास नेरकर, शिरसोलीचे तलाठी भरत नन्नवरे, जळके येथील राहुल अहिरे, अनिरुद्ध खेतमाळीस व नितीन ब्याळे अशांचा या पथकात समावेश आहे.

मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील वावडदा चौफुलीवर विना क्रमांकाचे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पथकाने पकडले. त्यावेळी ट्रॅक्टर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे काही अंतरावर ते ट्रॅक्टर पकडले असता चालक सागर चव्हाण याने तलाठी राहुल अहिरे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत वाद घातला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक विशाल सोनवणे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment