एलसीबी पथकाकडून पाच लाखाचा गुटखा जप्त

On: October 11, 2020 1:45 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अमळनेर येथून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील शनी पेठ मंगळ नगर येथील गोकुळ जगन्नाथ पाटील यांच्या घरात पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.

या छाप्यात 5,15,120 रुपयांचा गुटखा मिळून आला.याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला भा.द.वि.272, 273,328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत सहायक फौजदार नारायण पाटील, हे.कॉ.रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, पोलीस नाईक मनोज दुसाने, दीपक शिंदे, पो.कॉ.परेश महाजन तसेच चालक पोलीस नाईक प्रवीण  आदींनी सहभाग घेतला.पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment