पारले जी ने देखील बंद केल्या जाहिराती

मुंबई : टिआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी नुकताच केला आहे. त्यामुळे लहान पडद्याच्या मागे खळबळ माजली आहे. जाहिरातदार व त्यांच्या मिडीया एजन्सीकडून लहान पडद्यावरील कार्यक्रमाच्या प्रसारणावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बजाज कंपनीच्या संचालकांपाठोपाठ आता पारले जी या आघाडीच्या कंपनीने देखील सामाजिक स्वास्थ दुषीत करणा-या तसेच समाजात तेढ निर्माण करणा-या चॅनल्सवर त्यांच्या कंपनीच्या जाहिरातींना लगाम लावला आहे.

पारले जी या बिस्कीटाची लहान पडद्यावर जाहिरात केली जाणार नसल्याचे या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनल्सची नावे टीआरपी स्कॅममध्ये पुढे आली होती.

पारले जी या बिस्कीट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी म्हटले आहे की सामाजिक स्वास्थ खराब करणा-या व समाजात तेढ निर्माण करणा-या कंटेंटचे प्रसारण करणा-या न्यूज चॅनल्सवर कंपनीकडून कुठलीही जाहिरात केली जाणार नाही.

बजाज कंपनीने यापुर्वी अशा स्वरुपाचा निर्णय घेतला आहे. त्याचेच अनुकरण पारले जी कंपनीकडून केल्याचे आता दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here