किराणा दुकानात मारहाण व तोडफोड प्रकरणी चौघे अटकेत

On: October 14, 2020 6:29 PM

जळगाव : आव्हाणे रस्त्यावरील किराणा दुकानात चौघांनी दुकानदारास मारहाण तसेच त्याचा मुलगा व मुलीस शिवीगाळ केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत वृत्त असे की संजय बाबुलाल जैन यांचे आव्हाणे रस्त्यावर किराणा दुकान आहे. त्यांचा मुलगा महावीर याची स्कुटी रस्त्यात बंद पडल्यामुळे तो रस्त्यात उभा होता. दरम्यान तेथून समीर शेख शफी, बिस्मील्ला शेख शफी, शोएब शेख शाबीर, अरबाज शेख शफी हे चौघे जण जात होते. आपल्याला बघून महावीर याने त्याची स्कुटी बंद पाडली असा चौघांचा गैरसमज झाला. त्यातून चौघांनी महावीर यास शिवीगाळ सुरु केली. चोघे जण एवढ्यवरच थांबले नाही तर त्यांनी महावीर याचे वडील संजय जैन यांच्या दुकानात येवून दुकानातील सामानाची नासधुस सुरु केली.

संजय जैन यांचा मुलगा तसेच मुलगी यांना शिवीगाळ सुरु केली. अरबाज शेख याने हातातील लाकडी दांडक्याने संजय जैन यांच्या डोक्यावर मारहाण केली. त्यात ते जखमी झाले.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो. नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment