मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ ब्लॅकमेल करत केला तिन वर्ष लैंगिक अत्याचार

On: June 23, 2020 5:58 PM

सोनीपत : तयार केलेला अश्लील व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर सलग तीन वर्ष लैंगीक अत्याचार केल्याचा आरोप  तरुणीने केला आहे. सोनीपत गोहानामध्ये एका तरूणीला तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. पीडित तरुणी बरोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामिण भागात राहते. संशयित आरोपी असलेला तरुण तिच्या नातेवाईकाचा मित्र आहे. काही वर्षांपूर्वी एका लग्न समारंभात तिची ओळख त्या तरुणासोबत झाली होती. दरम्यान, एक दिवस आरोपीने तिच्यासोबत जवळीक करत तिच्यावर लैंगीक अत्याचाराचा गैरप्रकार केला. याशिवाय त्याने या घटनेचा व्हिडीओ तयार केला व तिचे फोटो देखील काढले. या व्हिडीओ व फोटोच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु केला.

तरुणीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करत सांगितले की, सदर तरुण दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह आपल्या गावी आला होता.  त्याच्या मित्रांकडून देखील तो  बलात्कार करू पाहत होता. त्याच्या मित्रांनीही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या जबाबावरुन पोलिसांनी चौघा तरुणांविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment