मुंबई : घरगुती स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम आता पुढील महिन्यापासून बदलणार आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासह योग्य ग्राहकाची खात्री पटवण्यासाठी गॅस कंपन्या नवीन डिलिव्हरी सिस्टिम लागू करणार आहेत.
या नव्या सिस्टिमला डीएसी असे नाव देण्यात आले आहे. डीएसी याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आहे. या सिस्टीम अंतर्गत यापुढे फक्त बुकिंग करुन सिलेंडरची डीलिव्हरी मिळणार नाही. सिलेंडर डीलीव्हरीपुर्वी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉयला हा कोड दाखवल्याशिवाय यापुढे सिलेंडर मिळणार नाही.
एखाद्या गॅस ग्राहकाने वितरकाकडे त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या अॅपच्या सहाय्याने आपल्याला रियल टाईम नंबर अपडेट करता येणार आहे. त्यानंतर कोड जनरेट होईल.
या यंत्रणेमुळे चुकीचा पत्ता अथवा चुकीचा मोबाईल नंबर देणा-या ग्राहकांना ते अडचणीचे ठरणार आहे. या सिस्टीम मुळे गैर प्रकारांना आळा बसेल असे म्हटले जात आहे. सुरुवातीला ही नवीन यंत्रणा शंभर स्मार्ट सिटीमधे लागू केली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरात सुरु होईल. सुरुवातीला प्रायोगीक तत्वावर ही सिस्टीम जयपूर येथे सुरु करण्यात आली आहे.