चौघांच्या हत्येने रावेर तालुक्यात खळबळ

On: October 16, 2020 12:09 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या रावेर शहरालगत असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतात आज सकाळी एकाच कुटूंबातील चौघा भावांची निघृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी पथक घटनास्थळी दाखल झाले. रावेर शहरालगत बोरखेडा शेत शिवारातील शेख मुस्ताक यांच्या शेतात काही वर्षापासून मयताब भिलाला हे आपल्या कुटूंबासह राहतात.

नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी मयताब भिलाला हे पत्नीसह मध्य प्रदेशात गेले होते. दरम्यान त्यांची दोन मुले व दोन मुली असे चौघे जण घरीचे होते.
काल रात्री 15 ऑक्टोबर रोजी जेवण आटोपून चौघे भाऊ बहीण झोपले होते. आज सकाळी चौघा भाऊ बहिणींची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पहाटे शेतमालक

मुश्ताक हे शेतात आल्यावर त्यांना मयताब भिलाला यांचे घर बंद दिसले. त्यांनी जवळ जावून घरात डोकावून पाहिले असता त्यांना भयावह प्रकार दिसून आला. चौघा भाऊ बहिणींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांची तिक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या झालेली होती.

हे देखील वाचा — विषारी दारुचे 14 बळी – 10 अटकेत

या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ रावेर पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच तातडीने फैजपूर येथून उप विभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे तसेच पो. नि. रामदास वाकोडे यांनी आपपापल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. एकाच वेळी चौघा भाऊ बहिणींची हत्या कुणी व का केली असावी याची चर्चा सुरु होती. दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment