घरगुती वादातून सीएने केली पत्नी व सासूची हत्या

On: June 23, 2020 5:57 PM

कोलकाता : कौटुंबिक कलहातून बंगळुरुच्या चार्टर्ड अकाऊंटंटने पत्नीची हत्या केली त्यानंतर विमानाने सासरवाडी असलेल्या कोलकाता येथे जावून सासूला देखील गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली. त्यानंतर संशयीत आरोपी असलेल्या सी.ए. ने स्वत: वरदेखील गोळ्या झाडून आपली जिवनयात्रा संपवली.

मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी अमित अग्रवाल याने आधी बेंगळुरुच्या महादेवपुरामधील घरी पत्नीचा खून केला. त्यानंतर तो कोलकाता येथील सासरवाडीला गेला. तिथे गेल्यानंतर त्याचे सासरच्या लोकांसोबत कडाक्याचा वाद झाला. यावेळी त्याने सासूवर गोळ्या झाडल्या. सासऱ्यांना देखील मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते सुदैवाने बचावले.

अमितने सासूवर गोळी झाडण्यासाठी बंदूक काढताच सासरे घरातून बाहेर पळाले. बाहेरुन दरवाजा बंद केल्याने सी.ए. घरात अडकला. पोलिस येण्याच्या आत त्याने स्वत:वर गोळ्या झाडत आपली जिवनयात्रा संपवली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment