मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सक्तीने पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स तसेच व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे जाहीर केले आहे. मात्र त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जिम, फिटनेस सेंटर्स व
व्यायामशाळेच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत ते बोलत होते. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार मात्र पुर्णपणे बंद राहणार आहेत.
मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, जिम, व्यायामशाळा या आपल्या आरोग्यासाठीच आहेत. मात्र त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत यासाठी पुरेपुर काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.