बेपत्ता बालिकेचा विहीरीत आढळला मृतदेह

On: October 18, 2020 4:50 PM

धुळे : रावेर येथील चौघा बहिण भावांची सामुहीक हत्या झाल्याची घटना ताजी असतांना धुळे येथे एका दोन वर्षाच्या बेपत्ता बालिकेचा मृतदेह विहीरीत आढळून आला आहे. या घटनेने धुळे परिसरात खळबळ माजली आहे.

प्राची प्रविण महाजन असे या बालिकेचे नाव असून ती आधी बेपत्ता झाली होती. तिच्या हवालदिल झालेल्या पालकांनी तिचा शोध घेत असतांना अचानक तिचा मृतदेह आढळून आला. परिसरातील निमगुळ शिवारातील एका विहीरीत तिचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.

या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप गांगुर्डे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने प्राचीचा मृतदेह बाहेर काढून तो शव विच्छेदनकामी रुग्णालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळी प्राची आपल्या पालकांसह घरात झोपली असतांना कुणीतरी दार उघडून तिचे अपहरण करत तिला विहीरीत टाकून दिले असावे अशी चर्चा आहे. हा नेमका घातपात की नरबळी? तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या? हे सर्व तपासात समजणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment