घटस्थापनेला रुग्णालयात 9 मुलींचा जन्म

On: October 18, 2020 5:51 PM

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील सिंडीकेट परिसरात असलेल्या “वैष्णवी” रुग्णालयात घटस्थापनेच्या दिवशी शनिवारी तब्बल 9 मुलींचा जन्म झाला. नवरात्रीच्या वेळी एकाच दिवशी नऊ मुलींचा जन्म हा जणू काही नवदुर्गांनी जन्म घेतल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी घटस्थापनेच्या दिवशी या रुग्णालयात अकरा महिलांची प्रसुती झाली. यापैकी 9 महिलांना कन्या रत्न तर दोघा महिलांना पुत्र प्राप्ती झाली.

रुग्णालयात एकाच दिवशी अकरा प्रसुती होणे ही तशी विशेष बाब नसली तरी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नऊ मुलींचा जन्म एक आगळीवेगळी बाब असल्यचे म्हटले जात आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment