जळगाव : तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यात नेहमी सहभाग सुमित पाटील यांचा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव या संस्थेतर्फे समाजभुषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
सुमित पाटील हे खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक असुन वावडदा येथील गौरी गृपचे चेअरमन आहेत.
रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी रेड क्रॉस सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर जळगावच्या महापौर भारती सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळके येथील माजी सरपंच रमेश पाटील, काबरा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा, रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, संस्थेच्या अध्यक्षा सौ.संदिपा वाघ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सुमित पाटील हे खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून या गृपच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो विवाह जुळवून आणले आहेत. सामाजिक कार्यात सहभाग घेत असतांना ते सतत विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा एस.डी.वाघ यांनी म्हटले आहे. आपले सामाजिक काम यापुढे देखील असेच सुरु राहणार असल्याचे सुमित पाटील यांनी म्हटले आहे.