नवजात कन्येचा मातेने घोटला गळा

सांगली : अवघ्या दोन दिवसांपेक्षाही कमी वयाच्या नवजात मुलीला तिच्या आईनेच गळा दाबून ठार केल्याची घटना सांगली येथील शासकीय रुग्णालयात घडली. या घटने प्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (३०) यलापूर जि. बेळगाव असे त्या निर्दयी मातेचे नाव आहे. या कुमातेवर विश्रामबाग पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कर्नाटकातील सुमित्रा जुट्टी ही महिला प्रसुतीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याच रात्री तिने मुलीचा गळा आवळून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला.

त्याच वार्डातील दुसऱ्या प्रत्यक्षदर्शी महिलेने या घटनेची माहिती डॉक्टरांना दिली होती. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी तात्काळ दखल घेत त्या नवजात बाळावर वैद्यकीय उपचार सुरु केले होते.

मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या कन्या रत्नाचा मृत्यू झाला. तिच्या मानेवर गळा आवळल्याचे व्रण दिसून आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने विश्रामबाग पोलिस स्टेशनला याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. त्या निर्दयी मातेवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here