पुणे : एखाद्या आपत्कालीन प्रसंगात पोलिसांसोबत संपर्क साधण्यासाठी 100 हा क्रमांक सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. अडचणीत सापडलेल्या जनतेसाठी 100 हा पोलिस हेल्पलाईन क्रमांक गेल्या कित्येक वर्षापासून जनतेच्या सेवेत आहे.
मात्र लवकरच 100 हा क्रमांक लवकरच इतिहासजमा होणार आहे. या क्रमांकाएवजी आता 112 हा नवीन क्रमांक आपात्कालीन जनतेच्या सेवेत येणार आहे. या 112 क्रमांकावर सर्व प्रकारची मदत मिळणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात पोलिस सेवेसाठी 100, अग्नीशमन दलासाठी 101 आणि महिला हेल्प लाईनसाठी 1090 असे क्रमांक वापरले जात होते. मात्र आता सर्व प्रकारच्या आपत्कालीन सेवेसाठी यापुढे लवकरच 112 हा हेल्पलाईन क्रमांक अस्तित्वात येणार आहे. या क्रमांकाची सेवा देशातील 20 राज्यांसह केंद्रशासीत प्रदेशांनी सुरु केली असल्याची माहिती आहे. लवकरच महाराष्ट्रात या क्रमाकांची आपात्कालीन सेवा सुरु होईल.