जळगाव : जळगाव जिल्हयाच्या रावेर येथील (बोरखेडा) चौघा भाऊ – बहिणींच्या सामुहिक हत्याकांड प्रकरणी एका विस वर्षाच्या संशयीतास आज अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली आहे. आज जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दिघावकर बोलत होते.
या गुन्ह्यात बलात्काराचे कलम वाढवण्यात आल्याची माहिती डॉ. दिघावकर यांनी काही दिवसांपुर्वी रावेर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर आज जळगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आरोपी अटकेची माहिती देण्यात आली आहे.
महेंद्र सिताराम बारेला (20) रा. के-हाळा ता. रावेर असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांचेकडून मिळालेल अहवाल, तांत्रिक व शास्त्रीय पुरावे, घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुरावे या सर्व बाबींचा आधार घेत या तरुणास अटक करण्यत आली आहे.
रावेर शिवारातील बोरखेडा रस्त्यालगत शेतात 16 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेत मालक गेले असता शेतात शेतमजुराचे घर त्यांन बंद अवस्थेत दिसून आले. घरातील सदस्य झोपेतुन उठले का नाही म्हणुन आवाज दिला असता घरातून कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे आत प्रवेश केला असता 13 वर्षाची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाचा मुलगा व 6 वर्षाची मुलगी अशा चौघांच्या गळयावर धारदार शस्त्राने गंभीर जखमा झालेल्या होत्या. तसेच चौघे मुले मयत अवस्थेत आढळून आले होते.
घटनास्थळावर एक लाकडी दांडा असलेली रक्ताने माखलेली कु-हाड देखील पडलेली होती. या प्रकरणी शेत मालकाच्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 188/2020 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान मिळालेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यानुसार 376 (अ), 452, लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 या कलमांची वाढ करण्यात आलेली आहे.
या गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना तपासकामी सुचना देण्यात आल्या होत्या.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी सदर गुन्हयाच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामिण, धुळे व नंदुरबार येथील पथके तसेच सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा ( जळगाव उपविभाग), फैजपूर उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक नरेंद्र पिगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापु रोहोम, नाशिक ग्रामिणचे पो.नि.के.के.पाटील, रावेर पोलिस स्टेशनचे पो.नि. रामदास वाकोडे, स.पो.नि. शितलकुमार नाईक, स.पो.नि. स्वप्निल नाईक, पोलिस उप अधिक्षक मनोज वाघमारे, पोलिस उप निरिक्षक सुधाकर लहारे, पो.उ.नि. अंगत नेमाणे, पो.उ.नि. रोहीदास ठोंबरे , पो.उ.नि. योगेश राऊत (नंदुरबार), स.पो.नि. उमेश बोरसे (धुळे), पो.उ.नि.राजेंद्र पवार, पो.उ.नि.योगेश शिंदे यंचे सह रावेर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामिण, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सायबर पोलीस स्टेशन जळगाव असे सुमारे 70 पोलीस कर्मचारी तपासकामी नेमण्यात आले होते.
या गुन्ह्याच्या तपासकामी 54 साक्षीदारांची सखोल चौकशी करण्यात आली. या गुन्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव यांच्याकडून मिळालेला मयताचा शवविच्छेदन अहवाल, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांच्याकडून मिळालेला अहवाल, तांत्रिक व शास्त्रीय पुरावे, घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा महेंद्र सिताराम बारेला (20) रा.के-हाळा ता.रावेर याने केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
त्याला अटक करण्यात आली असून इतर संशयीतांची कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा (जळगाव उप विभाग) हे करत आहेत.