डॉक्टरांकडून खंडणी मागणारा अटकेत

जळगाव : भुसावळ येथील डॉक्टरांना चाकूच्या धाकावर दरमहा पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणा-या तरुणास बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.

भुसावळ येथील जामनेर रस्त्यावर डॉ. स्वप्नील राजाराम कोळंबे यांचा दवाखाना आहे. त्यांना चौघे जण गेल्या काही दिवसांपासून सतत पन्नास हजार रुपयांची खंडणी मागून त्रस्त करत होते. त्यामुळे डॉ. कोळंबे यांनी या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रितसर गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न 901/20 भा.द.वि. 387, 504, 506, 507, 34,आर्म अँक्ट 3/25, 4/25 नुसार दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर खंडणी मागणारे चोघे आरोपी फरार झाले होते.

यातील संदीप बुधा खंडारे नावाचा खंडणी मागणारा आरोपी 22 ऑक्टोबर रोजी हा नाहाटा महाविद्यालयानजीक आला असल्याची माहिती पो.नि. दिलीप भागवत यांना समजली. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी स.पो.नि अनिल मोरे, स.पो.नि मंगेश गोटला, सहायक फौजदार तस्लीम पठाण, पो. ना. रविंद्र बि-हाडे, कृष्णा देशमुख, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे यांना रवाना करुन सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. मंगेश गोटला करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here