दिग्गज क्रिकेटपटू कपील देव यांना हृदयविकाराचा झटका

On: October 23, 2020 4:57 PM

नवी दिल्ली : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे वृत्त असून त्यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्ली येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कपिल देव यांची अँजिओप्लास्टी काही दिवसांपुर्वी झाली होती. ते रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे.

कपिल देव यांच्या प्रकृतीची बातमी समोर येताच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरु केली आहे. कपील देव यांनी भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक मिळवून दिला आहे. त्यांची गणना जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये करण्यात येते. भारताने पहिल्यांदाच सन १९८३ मध्ये विश्वकप जिंकला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment