जुळ्या मुली झाल्या, आईने पाण्यात बुडवले एकीला

On: June 23, 2020 6:37 PM

भंडारा:  मुली व त्यादेखील जुळ्या झाल्याने एका निष्ठूर मातेने आपल्या 26 दिवसांच्या मुलीला थेट पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केल्याची घटना भंडारा जिल्हयात घडली.

सर्वत्र बेटी बचाव बेटी पढाव चा नारा दिला जात असतांना भंडारा जिल्हयात काल सायंकाळी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील निर्दयी मातेविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कुटूंबातील काही सदस्यांना देखील  चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. आरोपी मातेला अटक करण्यात आली आहे. अल्फीया निश्चय रामटेके (२२) असे त्या मातेचे नाव असून तिला मुलगाच हवा होता. आपल्या मुलीला कुणीतरी उचलून नेले असल्याचा कांगावा तिने केला होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment